दोन महिन्यात लाडकी बहीण योजना बंद होणार?

राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेला सोलापूरसह अन्य भागात जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान आज महायुती सरकार लाडकी बहीण योजनेचे पैसे देत आहेत. कोणी मागितले होते पैसे? मला आपल्या इकडच्या राजकारण्यांचा उद्देश,हेतूच कळत नाही. तुमच्याकडे कोणी मागितले होते पैसे?, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी काल महायुती सरकारवर लाडकी बहीण योजनेवरून टीका केली.
आज मी तुम्हाला लिहून देतो, लाडकी बहीण योजना आहे ना त्यांची; गेल्या काही महिन्यांचे पैसे येतील. कारण निवडणुका तोंडावर आहेत. या महिन्याचे पैसे येतील. पुढच्या महिन्याचे येतील. नंतर येणार नाहीत. यावरती जाऊ नका तुम्ही. हे जे पैसे वाटणं सुरू आहे. त्यावरून जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात अशी परिस्थिती निर्माण होईल की, या सरकारकडे पगार द्यायला पैसे नसतील. कोण मागतंय त्यांच्याकडे फुकट? महिलांच्या हाताला काम द्या, त्या कमवतील पैसे. कोणी मागितले आहेत फुकट पैसे? गरीबाला पैसे, मजुराला पैसे, शेतकऱ्यांना वीज फुकट देताय. शेतकरी कुठे मागतोय फुकट? ते फक्त विजेत सातत्य मागत आहेत. राज्यात कोणीच फुकट काही मागत नाही. यांना त्या सवयी लावायच्या आहेत, असे ते म्हणाले.