क्राईम
हात बांधले होते, तोंडावर बुरखा होता; तरीही अक्षय शिंदेने पोलिसांवर हल्ला कसा केला?

पोलिसांनी काल बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर केला. त्यांच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज राज्य सरकार व पोलिसांवर थेट आरोप केले आहेत. हात बांधलेले असताना व तोंडावर बुरखा असताना अक्षय याने पोलिसांवर हल्ला कसा केला, असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला आहे.
राऊत यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात पोलीस हे अक्षय याला कुठेतरी नेताना दिसत आहेत. त्यावेळी अक्षय याच्या तोंडावर बुरखा आहे. त्याचे दोन्ही हात बांधलेले दिसत आहेत. त्याच व्हिडिओकडे लक्ष वेधून राऊत यांनी प्रश्न केला आहे. अशा अवस्थेतील पोराने पोलिसांवर हल्ला कसा केला. नक्की काय घडले? महाराष्ट्राला हे सत्य कळायलाच हवे.

एखाद्या गुन्हेगारासाठी हळहळण्याचे कारण नाही. मात्र, या एन्काऊंटरमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. हा जो आरोपी होता, तो शाळेत सफाई कामगार होता. संडास साफ करण्याचे काम करत होता. असा मुलगा बंदूक कधीपासून चालवायला लागला. पोलिसांच्या कमरेवरील बंदूक हिसकावली. लॉक असलेली बंदूक चालवून त्याने गोळीबार केला हे कोणाला पटेल का? असे प्रश्न राऊत यांनी केले.