बिजनेस
भारीच! पाण्यात पडल्यानंतरही काहीच होणार नाही
सध्या स्मार्ट फोनची क्रेझ मोठया प्रमाणात वाढत आहे. दरम्यान मोटोरोलाने भारतात एज ५० सीरिजमधील आणखी एक स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीचा नवा मिड बजेट स्मार्टफोन मोटोरोला एज ५० निओ भारतात लॉन्च करण्यात आला. पाच वर्षांच्या ओएस अपडेटसह येणारा हा मोटोरोलाचा पहिला फोन आहे.
एज ५० निओ मिलिटरी ग्रेड एमआयएल- एसटीडी- ८१० एच प्रमाणपत्रासह येते. नव्याने लॉन्च करण्यात आलेल्या स्मार्टफोनमध्ये ३००० निट्स ब्राइटनेस आणि १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.४ इंचाचा सुपर एचडी एलटीपीओ डिस्प्ले देण्यात आला आहे. मोटोरोलाच्या एज ५० सीरिजमध्ये मोटो एज ५० अल्ट्रा, मोटो एज ५० फ्यूजन आणि मोटो एज ५० प्रोचा समावेश आहे.
मोटोरोला एज ५० निओ केवळ एका व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटरनल स्टोरेज मिळत आहे. या फोनची किंमत २३ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली होती.
एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे फोन खरेदी केल्यास एक हजार रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. हा स्मार्टफोन नॉटिकल ब्लू, लॅट, ग्रिस्टेल आणि पोइन्सियाना या चार पॅंटोन-प्रमाणित रंगांमध्ये उपलब्ध आहे. सर्व फोन लेदर फिनिशसह येतात. मोटोरोला एज ५० निओचा पहिला सेल २५ सप्टेंबर रोजी संध्याकाळी सात वाजता ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर सुरू होईल.