महाराष्ट्र
लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज!
- सध्या सोलापूरसह संपूर्ण राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गाजत आहे. दरम्यान आता महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा व्हायला सुरूवात होणार आहे. त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्या महिलांच्या नजरा बँक खात्यांकडे लागल्या आहेत.
- आता सरकारने लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर दिली आहे. ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज भरणार आहेत, त्यांना याच महिन्यात योजनेचे पैसै दिले जाणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यामुळे त्या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
- नागपूर जिल्ह्यातील बहादूरा तालुक्यातील महिला मेळाव्यात तटकरे बोलत होत्या. तटकरे म्हणाल्या की, ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत. त्या महिलांना योजनेचा निधी सप्टेंबर महिन्यातच मिळणार आहे. आतापर्यंत अर्ज केल्यानंतर तो मंजूर झाल्यावर दुसऱ्या महिन्यात त्याचा लाभ दिला जायचा. मात्र आता सप्टेंबर महिन्याचा लाभ या महिन्याच्या अखेरच्या आधी तुमच्या अकाऊंटला डिबीटी करणार आहोत, असे तटकरे म्हणाल्या.