राजकीय

ब्रेकिंग! गंभीर आरोप करणारे पत्र व्हायरल

कोणाच्या खांद्यावर कोणाचं ओझं या मथळ्याखाली ‘गब्बर’ नावाने एक पत्र व्हायरल झाले आहे. दरम्यान, याआधी उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचे नाव न घेता त्यांना उद्देशून एक पत्र व्हायरल झालं होते. यानंतर आता जेष्ठ नेते शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप करणारे पत्र बारामतीत व्हायरल होत आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बारामतीत निनावी पत्रांचे वार सुरू झाले आहेत.
पत्रात नेमकं काय म्हटलंय?-
बारामतीने आपणास चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्याकरता भरभरून प्रेम दिलं. तुम्ही तुमचा वारसा दादांना दिला, तुमचं मार्गदर्शन आणि दादांच परिश्रम यातून बारामतीचा विकास झाला, मग दादांनीही आपलं कौशल्य दाखवत इतर तालुक्याच्या तुलनेत दहा पटीने बारामतीचा विकास केला. मग एका नातवाला राजकारणात आणण्याचा प्रयोग तुम्ही केला आणि जिल्हा परिषद सदस्य केला मग अनुभव आल्यानंतर त्याला आमदार केला आता तो नातुही तिकड सेट झालाय. मात्र ही विषाची परिक्षा कशासाठी की आता तो नातूही तिकड सेट झालाय. मात्र ही विषाची परिक्षा कशासाठी की आता आणखी एका नातवाला डायरेक्ट आमदार करून विकास भकास करायला निघालाय…, असे पत्रात म्हटले आहे.

Related Articles

Back to top button