क्राईम

ब्रेकिंग! वनराज आंदेकर खून प्रकरणात मोठी घडामोड

काही दिवसांपूर्वी पुण्यात माजी नगरसेवकाचा भररस्त्यात खून करण्यात आला होता. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. तसेच पुण्यातील गुन्हेगारीचा मुद्दा नव्याचे चर्चेत आला. माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत 22 आरोपींना अटक केली. यातील काही आरोपींना चक्क ताम्हिणी घाटातून बेड्या ठोकल्या होत्या. आता वनराज प्रकरणातील सर्वच आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
वनराज खून प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली असून एकूण 22 आरोपींवर पुणे पोलिसांकडून मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनराज आंदेकर खूनप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे या आरोपींच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

Related Articles

Back to top button