क्राईम
अभिनेत्रीला अटक करुन ४० दिवस ठेवले कोठडीत
- अभिनेत्री आणि मॉडेल कादंबरी जेठवानी हिची योग्य चौकशी न करता चुकीच्या पद्धतीने अटक करून तिचा छळ केल्याप्रकरणी आंध्र प्रदेश सरकारने भारतीय पोलीस सेवेच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.
माजी गुप्तचर प्रमुख पी. सीताराम अंजनेयुलू , विजयवाडाचे माजी पोलीस आयुक्त क्रांती राणा टाटा आणि माजी पोलिस उपायुक्त विशाल गुन्नी या अधिकाऱ्यांना निलंबनाला सामोरे जावे लागले. ऑगस्टमध्ये कादंबरीने एनटीआरचे पोलीस आयुक्त एस. व्ही. राजशेखर बाबू यांच्याकडे औपचारिक तक्रार दाखल केली. संबंधित अधिकाऱ्यांनी वायएसआर काँग्रेस पक्षाचे नेते आणि चित्रपट निर्माते के. व्ही. आर. विद्यासागर यांच्यासोबत कट रचल्याचा कादंबरीने आरोप केला होता.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी विद्यासागर यांच्याशी संगनमत करून तिला आणि तिच्या पालकांना त्रास दिला आणि कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांना अटक करून मुंबईहून विजयवाडा येथे नेले, असे तिने फिर्याद दिली. मूळची मुंबईची रहिवासी असलेल्या कादंबरी हिने सांगितले की, पोलिसांनी तिचा आणि तिच्या वृद्ध आई-वडिलांचा अपमान करून त्यांना बेकायदेशीर नजरकैदेत ठेवले. जेठवानीच्या कुटुंबीय ४० दिवसांहून अधिक काळ न्यायालयीन कोठडीत राहिले.