बिजनेस

ब्रेकिंग! बजाज हाऊसिंग फायनान्सची धमाकेदार एन्ट्री

आयपीओची घोषणा झाल्यापासूनच प्रचंड चर्चेत असलेला बजाज हाऊसिंग फायनान्सचा शेअर आज बाजारात सूचीबद्ध झाला. एनएसई आणि बीएसई या दोन्ही प्लॅटफॉर्मवर या शेअरने दणक्यात पदार्पण केले. तब्बल ११४ टक्के वाढीसह हा शेअर सूचीबद्ध झाला. परिणामी पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले.
व्यवस्थापनांतर्गत मालमत्तेच्या निकषानुसार देशातील दुसऱ्या क्रमांकाची गृहकर्ज वित्तपुरवठादार कंपनी असलेल्या बजाज हाऊसिंग फायनान्सचा आयपीओ मागील आठवड्यात दाखल झाला होता. बजाज समूहाचे नाव, कंपनीचा आतापर्यंतचा ट्रॅक रेकॉर्ड आणि आर्थिक स्थिती मजबूत असल्याने आयपीओला तुफान प्रतिसाद मिळाला.
बजाज हाऊसिंग फायनान्सला आयपीओचा आकार ६,५६० कोटी रुपयांचा होता. प्रत्यक्षात हा आयपीओ जवळपास ६७ पट सब्सक्राइब झाला. त्यासाठी सुमारे ३८.६० अब्ज डॉलर्सची बोली लागली होती. लिस्टिंगच्या आधी कंपनीचा शेअर इश्यू प्राइसच्या १२० टक्के जीएमपीसह व्यवहार करत होता.
आयपीओमधून मिळणारी निव्वळ कमाई कंपनी भविष्यातील कर्जाशी संबंधित व्यावसायिक गरजा पूर्ण करण्यासाठी वापरणार आहे. कंपनीची एकूण परिस्थिती पाहता गुंतवणूकदारांनी मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करावा, असे तज्ज्ञांचे मत आहे.

Related Articles

Back to top button