मनोरंजन

इंटिमेट सीनसाठी भयानक कांड आणि सर्वस्व लुटलं

  • गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कास्टिंग काऊचविषयी बोलताना दिसत आहे. त्यांनी इंडस्ट्रीमधील अनेक पुरुष निर्माते आणि दिग्दर्शकांवर आरोप केले. आता बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीने धक्कादायक खुलासा केला आहे. तिचा हा अनुभव ऐकून इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली आहे. आता ही अभिनेत्री कोण? असा प्रश्न सर्वाना पडला आहे.
    कास्टिंग काऊचचा अनुभव सांगणारी ही अभिनेत्री गेहना वशिष्ठ आहे. गेहनाने अलीकडे एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींवर भाष्य केले आहे. तिने तिला आलेला कास्टिंग काऊचचा अनुभव देखील सांगितला आहे.
    मी छत्तीसगडमधील एका छोट्या गावतून आले आहे. मी अभ्यासातही खूप हुशार होते. पण माझे लहानपणापासूनच अभिनेत्री होण्याचे स्वप्न होते. त्यामुळे मला माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईला यावे लागले. सुरुवातीला मला फक्त एक-दोन प्रोडक्शन हाऊसच माहिती होती. यामध्ये बालाजी प्रोडक्शनबद्दल खूप ऐकले होते. जेव्हा मी मुंबईत आले, तेव्हा मला बालाजी टेलिफिल्म्सचा दिग्दर्शक म्हणून ओळख एक व्यक्ती भेटली आणि मला काम देण्याचे त्याने आश्वासनही दिले, असे गेहना म्हणाली.
    पुढे ती म्हणाली, त्या व्यक्तीचे नाव प्रवीण जोहान असे होते. तो बालाजी टेलिफिल्म्समध्ये दिग्दर्शक असल्याचे त्याने सांगितले आणि त्याच्या बोलण्याला मी मनावर घेतले होते. यानंतर त्या व्यक्तीने मला घरी बोलावले. तिथे त्याने मला एका सीनसाठी डेमो द्यायला सांगितले. तो म्हणाला की, चित्रपटात एक सीन आहे जिथे तुला दारु प्यावी लागते. त्यामुळे मला आधी डेमो दाखव. त्याने मला खूप दारु प्यायला लावली. त्यानंतर मी पूर्ण नशेत होते. याचाच फायदा घेऊन त्याने माझ्यावर बलात्कार केला.
    या मुलाखतीमध्ये गेहनाने अनेक निर्माते आणि म्युझिक कंपन्यांवरही खळबळजनक आरोप केले आहेत.

Related Articles

Back to top button