सोलापूर

ब्रेकिंग! सोलापूर शांतताप्रिय शहर पण…

सोलापूर शांतताप्रिय शहर आहे, अशी ओळख निर्माण होत असताना पोलीस गणेशोत्सव कालावधीत गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना दादागिरी करून मंडळ बंद करण्यासाठी भाग पाडत आहेत. यासाठी आयुक्त साहेबांचा लेखी परवाना आहे का, असा जाब विचारला जात आहे. पोलीस आयुक्त साहेबांनी ईन चैनलला मुलाखत देताना 15, 16, 17 सप्टेंबर रोजी रात्री बारापर्यंत सवलत देण्यात येत असल्याची मुलाखत दिली आहे. असे असतानाही पोलिसांकडून होत असलेली दादागिरी सोलापूरकरांसाठी भूषणावाह नाही. त्वरित त्यांनी दमदाटी थांबवावी. याबाबत पोलीस उपायुक्त विजय कबाडे साहेब यांना फोनवर संपर्क साधून याची कल्पना दिली आहे. तरीसुद्धा सोलापूरच्या काही भागात पोलीस ऐकून न घेता दादागिरी करत आहेत. असे वागणारे पोलीस दोन नंबर धंद्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. गणेशोत्सव काळात अशी दमदाटी करण्याऐवजी दोन नंबर धंदे बंद करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा, ही अपेक्षा. पोलीस आयुक्त एम. राजकुमार आणि उपायुक्त विजय कबाडे यांनी ही दादागिरी थांबवावी आणि सोलापुरातील गणेशभक्तांना गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्याची संधी द्यावी, ही नम्र विनंती. अन्यथा गणेशभक्तांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. 
 सुरेशआण्णा पाटील
 माजी सभागृहनेता, सोलापूर महानगरपालिका, प्रदेश उपाध्यक्ष, भाजपा ओबीसी मोर्चा, महाराष्ट्र राज्य.

Related Articles

Back to top button