क्राईम
महिला पोलिसाचा धक्कादायक कारनामा

- राज्य पोलीस दलात एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील महिला पोलिसाने केलेला कारनामा ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. या महिला पोलीसाने मित्राच्या पत्नीला परपुरुषासोबत शारिरिक संबंध ठेवण्याचा आग्रह करत आणि जीवे मारण्याची धमकी दिली.
शारिरीक संबंध ठेवले नाही तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला जीवे मारण्यात येईल. मी पुण्याची लोकल आहे. माझी गुंडासोबत ओळख आहे, असे म्हणत या महिला पोलीसाने मित्राच्या पत्नीला धमकवले. या प्रकरणाची तक्रार मिळाल्यानंतर पुणे पोलीस आयुक्तांनी कारवाई करत त्या महिला पोलिसाचे निलंबन केले आहे. अनघा ढवळे असे आरोपी महिला पोलिसाचे नाव आहे.
पीडित महिलेने याबाबत कोल्हापुरातील गडहिंग्लज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर अनघावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
पुणे पोलीस दलातील कोथरुड वाहतूक पोलीस शाखेत अनघा पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे. तिने तिच्या मित्राच्या पत्नीवर परपुरुषाबरोबर संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला. जर तू परपुरषाबरोबर शारीरीक संबंध ठेवले नाही तर तुला आणि तुझ्या घरच्या लोकांना ठार करु, अशी धमकी दिली.