क्राईम

ब्रेकिंग! तीन वर्षापूर्वी गोळीबार, आता गुन्हा दाखल

ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आक्रमक संघटक म्हणून ते परिचित आहेत. पोलिसांकडून त्यांना यापूर्वी देखील काही गुन्ह्यांमध्ये अडकविण्याचे प्रयत्न झाल्याचा आरोप होत आहे. नाशिक तीन वर्षांपूर्वी शहरातील सिडको भागात आरपीआय शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणी आता बडगुजर यांचा मुलगा दीपक बडगुजर यांच्यावर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन वर्षांपूर्वी जाधव यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला होता. या गोळीबारात जाधव हे गंभीर जखमी झाले होते. या गोळीबार प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरु होता. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत पाच संशयित आरोपींना अटक केली आहे. दीपक यांच्या सांगण्यावरून गोळीबार झाल्याचे आता तीन वर्षानंतर पोलीस तपासात उघड झाले आहे.
याबाबत सुधाकर बडगुजर म्हणाले की, माझे आणि दीपक यांचे नाव घेण्यासाठी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांना मारहाण केली. ज्यांनी नाव घेतले त्यांची सखोल चौकशी करा. राजकीय हेतूने ही कारवाई केली जात आहे. मात्र, न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे.

Related Articles

Back to top button