क्राईम

ब्रेकिंग! पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात

  1. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कंटेनर व दुचाकीच्या अपघातात एका अठरा वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील अंगूर वाइनच्या समोर काल घडली आहे.
  2. सार्थक विकास बाहेती (वय 18, रा. सूर्या पार्क, गुजर वस्ती, कवडीपाट टोल नाक्याजवळ, कदमवाकवस्ती, ता. हवेली) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
  3. मिळालेल्या माहितीनुसार, सार्थक व त्याचा मित्र दुचाकीवरून त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त लोणी स्टेशनकडे दुचाकीवरून चालले होते. सार्थक हा गाडी चालवत होता तर त्याचा मित्र पाठीमागे बसला होता. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना त्यांची दुचाकी कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील एचपी गेट समोर असलेल्या अंगूरवाईंच्या कॉर्नर जवळ आले असता त्यांच्या दुचाकीला कंटेनरने जोरदार धडक दिली.
  4. या अपघातात सार्थक हा रस्त्यावर पडल्याने त्याच्या अंगावरून कंटेनर गेला. या अपघातात सार्थक हा गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा मित्र या अपघातात किरकोळ जखमी झाला आहे.

Related Articles

Back to top button