सोलापूर

सोलापूर ब्रेकिंग! चोरट्याने भल्या सकाळीच घातला दरोडा

सोलापूर (प्रतिनिधी) पती पत्नी शेजारी असलेल्या त्यांच्या मामाच्या घरी गेल्यावर अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून कडी कोयंडा उचकटून घरातील कपाटामधील सोन्या-चांदीच्या दागिण्यासह रोख रक्कम असा एकूण ८६ हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना दि.१५ सप्टेंबर रोजी पहाटे घडली.
याप्रकरणी अभिजीत भिमाशंकर कांबळे (वय-३५, रा. रविवार पेठ, जुना बोरामणी नाका) यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरिक्षक पडसळकर हे करित आहे. सकाळी झालेल्या या घटनेमुळे पोलीसही हैराण झाले आहेत.

Related Articles

Back to top button