निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर पहिल्यादा होत असलेल्या या विधानसभा निवडणुकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. लोकसभेप्रमाणे यावेळी देखील राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये लढत पाहायला मिळणार आहे.
तर दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने काही दिवसांपूर्वी पक्ष चिन्हातील तुतारी वाजवणारा माणूस लहान आणि अस्पष्ट दिसतो तर त्याचा आकार वाढवण्यात यावा अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. केंद्रीय निवडणूक आयोगाने या प्रकरणावर माहिती देत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मागणी मान्य केली आहे. त्यामुळे आता तुतारी वाजवणारा माणूस स्पष्टपणे आणि मोठा दिसेल.
तर दुसरीकडे आयोगाने शरद पवार यांची दुसरी मागणी फेटाळली आहे. पिपाणी या चिन्हावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी पवार यांनी केली होती. मात्र ही मागणी फेटाळली असल्याची माहिती आयोगाने दिली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये देखील पिपाणी चिन्ह अपक्ष उमेदवारांना मिळणार आहे. त्यामुळे लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला फटका बसणार का? याबाबत आता अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहे.