क्राईम
तरूणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले, अश्लील फोटो व्हायरल केले

- रक्षकच भक्षक झाल्याचा प्रकार राज्यात घडला आहे. एका पोलिसाने तरूणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तसेच तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. पोलीस हा स्वत: विवाहित होता. तरीही त्याने तरूणीसोबत अनैतिक संबंध ठेवले. त्या तरूणीला घरी घेऊन जाण्यास नकार दिला. तिला जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलिसावर गुन्हा दाखल झाला आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. चंद्रकांत शंकर दळवी, असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या प्रकारानंतर नाशिक पोलीस दलात खळबळ उडाली आहे. दळवी याने त्या तरूणीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते.
- प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणीशी शारीरिक संबंध ठेवणाऱ्या आणि तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दंगा नियंत्रण पथकातील पोलिस कर्मचारी दळवी याला निलंबित करण्यात आले आहे. इंदिरानगर येथील एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून, विवाहित असतानाही तिच्याशी लग्नाचा बनाव रचत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तिला घरी नेण्यास नकार देत फसवणूक केली. तसेच, तरुणीच्या पतीला गाडीखाली ठार मारण्याची धमकी देत तिचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी इंदिरा नगर पोलिस ठाण्यात दळवीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.