क्राईम
ब्रेकिंग! हैदराबादमध्ये मोठी दुर्घटना

हैदराबादच्या ऐतिहासिक चारमिनारजवळील गुलजार हौज भागात आज सकाळी भीषण आगीची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत 17 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. याशिवाय अनेजक जण जखमी झाले आहेत. आगीची माहिती मिळताच पोलिसांची टीम आणि फायर ब्रिगेडची टीम बचावकार्यासाठी घटनास्थळी पोहोचली आहे.
आज पहाटे पाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. इतकी मोठी आग लागण्याचे नेमकं कारण काय याची माहिती अजून समोर आलेली नाही.
इमारतीमधील एसीमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली असावी, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र याबाबत अजून खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही. सध्या येथे अग्निशमन विभागाचे वाहने पोहोचली आहेत. पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली आहे. या आगीत अनेकजण जखमी झाले आहेत. या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासाठी दहा रुग्णवाहिका येथे आहेत.



