राजकीय

मोदी सरकार कोसळणार?

राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा कधीही होवू शकते. सध्याचे वातावरण पाहात राज्यात सत्ता बदल अटळ असल्याचा दावा काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. शिवाय हरियाणातही काँग्रेसची सत्ता येत आहे असे चव्हाण म्हणाले. 
जर या दोन राज्यात सत्तांतर झाले तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे सरकार कोसळेल, असे भाकीत त्यांनी केले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे केंद्र सरकारचा पाठींबा काढून घेतील, असा दावा चव्हाण यांनी केला आहे. 
सध्याचे मोदी सरकार चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांच्या पाठींब्यावर उभे आहे. मात्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर हे दोघेही सरकारचा पाठींबा काढतील आणि केंद्रातले मोदी सरकार कोसळेल, असे त्यांनी सांगितले. अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकारही तेरा महिन्यात कोसळले होते याची आठवणही त्यांनी करून दिली. महाराष्ट्रातील जनतेने जर राज्यात सत्तांतर घडवून आणले तर हे शक्य आहे, असेही ते म्हणाले.
सध्याच्या स्थितीत मोदी सरकार फार काळ टिकणार नाही. हरियाणा आणि महाराष्ट्रातले सत्तांतर पाहून चंद्राबाबू आणि नितीश कुमार हे सरकारमधून बाहेर पडतील असा त्यांनी दावा केला आहे. दरम्यान यामुळे विविध चर्चा होत आहे. 

Related Articles

Back to top button