- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण प्रकरणात जामीन मिळाला आहे. सीबीआय प्रकरणात सुप्रीम कोर्टाने त्यांना हा जामीन मंजूर केला आहे. याआधी केजरीवाल यांना ईडीशी संबंधित एका प्रकरणात सुप्रीम कोर्टातून जामीनही मिळाला आहे. केजरीवाल यांच्या जामीन याचिकेवरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने 5 सप्टेंबर रोजी राखून ठेवला होता. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्वल भुईया यांच्या खंडपीठाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निर्णय राखून ठेवला होता. त्यानंतर आता सुप्रीम कोर्टाने केजरीवाल यांना जामीन मंजूर केला आहे. सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केल्याने केजरीवाल जवळपास 177 दिवस तुरुंगात काढल्यानंतर आता बाहेर येणार आहेत.
केजरीवाल यांच्या जामिनावर कोर्टाच्या चार अटी- अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री कार्यालयात जाऊ शकणार नाहीत. प्रकरणाशी संबंधित कोणतीही सार्वजनिक चर्चा करणार नाही. तपासात अडथळा आणण्याचा किंवा साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करणार नाही. गरज भासल्यास ट्रायल कोर्टात हजर राहून तपासात सहकार्य करेल.