बिजनेस

भारीच! सॅमसंग गॅलेक्सी एम ०५ भारतात लॉन्च

  • सॅमसंगने गॅलेक्सी एम ०५ भारतात लॉन्च केला आहे. हा फोन सॅमसंग गॅलेक्सी एम ०४ ची जागा घेईल. सॅमसंग गॅलेक्सी एम ०५ मध्ये मीडियाटेक हेलियो जी ८५ चिपसेटसह पाच हजार एमएएच बॅटरी आणि ५० एमपी कॅमेरा देण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे, हा फोन अवघ्या ८ हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च करण्यात आला आहे.
    सॅमसंग गॅलेक्सी एम ०५ मध्ये ६.७ इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 60 हर्ट्झ आहे. फोनमध्ये ४ जीबी LPDDR4X रॅम आणि ६४ जीबी इंटरनल स्टोरेज आहे, ज्याला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने १ टीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. हा स्मार्टफोन अँड्रॉइड १४ बेस्ड वनयूआय कोर ६.० वर चालतो.
    या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी ८ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. एफ/१.८ अपर्चरमुळे कमी प्रकाशाच्या वातावरणातही सविस्तर छायाचित्रे टिपण्याच्या फोनच्या क्षमतेवर कंपनीने भर दिला आहे.
    गॅलेक्सी एम ०५ ची किंमत ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत ७ हजार ९९९ रुपये आहे. ग्राहक अ‍ॅमेझॉन, सॅमसंगची अधिकृत वेबसाइट आणि इतर रिटेल भागीदारांद्वारे डिव्हाइस खरेदी करू शकतात.

Related Articles

Back to top button