बिजनेस

मोठी बातमी! शेअर मार्केटमध्ये भूकंप

  • अमेरिकेतील शेअर बाजारात घडणाऱ्या घडामोडींचा परिणाम भारतातील शेअर बाजारावर झाला आहे. आज सकाळच्या सत्रात सुरुवातीलाच शेअर बाजार गडगडला. जगभरात विक्रीचा दबाव वाढला, याला भारताचा शेअर बाजारही अपवाद राहिला नाही. काल अमेरिकन बाजारात खळबळ उडाली. ज्यामुळे मंदीचे संकट अधिक गडद होताना दिसत आहे. डाऊ जोन्सपासून नॅसडॅकपर्यंत घसरण नोंदवण्यात आली. याचा प्रतिकूल परिणाम गिफ्ट निफ्टीवर दिसून आला. आज सेन्सेक्स आणि निफ्टीत दबाव दिसून आला. या दिवशीचा व्यवहार सुरु होताच शेअर बाजार कोसळला.
    शेअर बाजारातील या परिस्थितीमुळे सुरुवातीच्या सत्रात निफ्टी आयटी, पीएसयू बँक आणि मेटल एक टक्क्यांनी घसरले. ओएनजीसी, विप्रो, एलटीआएम या कंपन्यांचे शेअर्स दोन टक्क्यांनी खाली आले. या परिस्थितीत गुंतवणूकदारांचे झटक्यात तब्बल 3.1 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 3.1 लाख कोटी रुपयांनी घसरून 462.4 लाख कोटींवर आले. इन्फोसिस, ICICI बँक, लार्सन अँड टुब्रो, टिसीएस, भारती एअरटेलची या घसरणीत मोठे भूमिका राहिली. JSW स्टील आणि टाटा स्टीलचे शेअर्सही 1.5 टक्क्यांनी घसरले.

Related Articles

Back to top button