क्राईम
धक्कादायक! वडा पाव खाण्याची इच्छा पडली पाच लाखांना
- राज्यात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दागिने सोडवून घेऊन घरी जात असताना वाटेत एका दाम्पत्याला वडा पाव खाण्याची इच्छा झाली आणि घात झाला. पत्नीला बाईक जवळ थांबवून ते वडा पाव आणायला गेले.
- दरम्यान चोरट्याने पैसे खाली पडल्याचे नाटक करुन पाच लाख रुपयांचे दागिने असलेली बाईकवरील पिशवी चोरुन नेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत दशरथ धामणे (वय ६९, रा. मांजरी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना पुण्यात शेवाळवाडी येथील रोहित वडेवाले यांच्या दुकानासमोर गुरुवारी दुपारी पावणेचार वाजता घडली.
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांची पत्नी सेवानिवृत्त आहेत. त्यांनी ऊरुळी कांचन येथील स्टेट बँक ऑफ इंडिया येथे तारण म्हणून चार लाख ९५ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने ठेवले होते.
- गुरुवारी त्यांनी ते दागिने सोडवून आणले. दागिन्यांची पिशवी त्यांनी बाईकला लावली होती. वाटेत रोहित वडेवाले या दुकानासमोर त्यांनी गाडी उभी केली. पत्नीला तेथेच थांबायला सांगून ते वडापाव घेण्यासाठी दुकानात गेले.
- तेवढ्यात त्यांच्या पाळतीवर असलेल्या चोरट्यांपैकी एक जण मोटारसायकलवर आला. त्याने त्यांच्या पत्नीला पैसे खाली पडले असल्याचे सांगितले. ते पाहून त्यांची पत्नी पैसे घेण्यासाठी दुचाकीच्या मागच्या बाजूला वळल्या.
- इतक्यात संधी साधून दुसर्या चोरट्याने बाईकला लावलेली दागिन्यांची पिशवी लंपास केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस नाईक पांडुळे करीत आहेत.