राजकीय

‘त्या’ दोन अटी अमान्य?

  1. केंद्रीय गृहमंत्रालयाने ज्येष्ठ नेते शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा दिली. केंद्रीय एजन्सींनी संभाव्य धोक्यांचा आढावा घेतल्यानंतर पवारांची वाय दर्जाची सुरक्षा वाढवून झेड प्लस सुरक्षा देण्याची तयारी केली. मात्र गृहमंत्रालयाच्या या निर्णयावर खुद्द पवारांनी संशय व्यक्त केला होता.
    पवारांच्या झेड प्लस सुरक्षेप्रकरणी आज दिल्लीतील घरी बैठक झाली. या बैठकीत पवारांनी ही सुरक्षा नाकारल्याची माहिती आहे. झेड प्लस सुरक्षा व्यवस्थेतील दोन अटींना पवारांनी नकार दिला आहे.
    सुरक्षा देण्याचा निर्णय झाल्याची माहिती थेट पवारांना देण्यात आली, दुसऱ्या कुणालाही याबाबत काहीच सांगण्यात आलेले नाही. सुरक्षेचे खरे कारण काय आहे, याबाबतची माहिती फक्त पवारांना देण्यात आली आहे.
    केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने सुरक्षा वाढवण्याचे कारण गुप्त ठेवण्यात आले. पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानाच्या भिंतीची उंची वाढवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. पवारांसोबत 50 सुरक्षा कर्मचारी तीन शिफ्टमध्ये असणार आहेत. त्यासोबतच सुरक्षा दलाकडून दिलेली गाडीच वापरावी, असा आग्रह पवारांना करण्यात आला आहे. परंतु, पवारांनी यासाठी स्पष्ट नकार दिल्याची माहिती आहे. 

Related Articles

Back to top button