देश - विदेश
मोठी बातमी! ड्रायव्हिंगबाबत लवकरच कडक नियम
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पेट्रोल डिझेल संदर्भात एक वक्तव्य केले आहे. अमरावती येथील ड्रायव्हिंग स्कूलच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. देशातून पेट्रोल आणि डिझेल संपवण्याचा मी संकल्प केला असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
आगामी काळात भारतामधून पेट्रोल डिझेल हद्दपार करणार आहे. तसा मी संकल्प केला आहे. आगामी काळात वाहतूक पद्धतीतही बदल केला जाणार आहे. देशात ड्रायव्हरची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. येणाऱ्या काळात ड्रायव्हरने फक्त आठ तास ड्रायव्हिंग करावे, असा नियम करणार असल्याचेही गडकरी यांनी सांगितले. देशात लवकरच चारशे इथेनॉल पंप सुरू करण्याची योजना आहे. इथेनॉल वापरामुळे ट्रान्सपोर्ट खूप स्वस्त होईल, असेही गडकरी म्हणाले.