शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन माफी मागतो
मालवणमध्ये जे झाले ते अतिशय वेदनादायी होते. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहेत. मालवण येथील शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन माफी मागतो. या घटनेमुळे शिवभक्तांच्या मनाला ठेस पोहचली आहे. त्यांचीही मी माफी मागतो, असे मोदी यांनी सांगितले. पालघर येथील सिडको मैदानात आज वाढवण बंदराच्या भूमिपूजन कार्यक्रमात मोदी बोलत होते. मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरूवातच शिवभक्तांच्या भाषणाने केली.
जे झाले ते अतिशय वेदनादायी होते. मी शिवाजी महाराजांच्या चरणात नतमस्तक होऊन त्यांची माफी मागतो. पश्चाताप न होणाऱ्यांपैकी आम्ही नाहीत. काही जण वीर सावरकरांना नाव ठेवतात. परंतु त्यांनी कधी सावरकरांची माफी मागितली का? याप्रसंगी शिवाजी महाराज ज्यांचे आराध्य दैवत आहेत, त्या असंख्य लोकांना वेदना झाल्या असतील. त्यांचीही माफी मागतो, असे मोदी म्हणाले.