बिजनेस
खुशखबर! जिओचा दिवाळी धमाका
- रिलायन्स वार्षिक सर्वसाधारण सभेचे उद्घाटन रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी जिओ एआय क्लाउड लाँच केले. त्यांनी म्हटले की, जिओ एआय क्लाउड वापरकर्त्यांसाठी स्वस्त दरात उपलब्ध होणार आहे. याच्या वापरामुळे वापरकर्ते त्यांचा डेटा इत्यादी अपलोड करण्यास सक्षम होतील आणि त्यात फोटो, व्हिडीओ, कागदपत्रे इत्यादी साठवता येईल. दरम्यान, अंबानी यांनी जिओ सिमकार्ड लाँच करतानाही मोफत ऑफर दिली होती.
अंबानी यांनी म्हटले की, जिओ एआय क्लाउडवर वेलकम ऑफर दिवाळीपासून सुरू होणार आहे.. ज्या अंतर्गत जिओ वापरकर्त्यांना 100GB मोफत क्लाउड स्टोरेज मिळेल. त्याच्या मदतीने प्रत्येक भारतीयाला प्रत्येक उपकरणावर एआय सेवा आणि क्लाउड स्टोरेजची सुविधा मिळू शकेल. जिओ एआय क्लाउडचे उद्दिष्ट प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्याचा आहे, मग त्याचा उत्पन्न गट कोणताही असो. आम्हाला एआय आणि त्याची वैशिष्ट्ये प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवायची आहेत. त्यामुळे प्रत्येकजण त्यांच्या कंपनीच्या कनेक्टेड इंटेलिजन्सचा वापर करू शकतील. ज्यामध्ये एआय सेवा आणि क्लाउड स्टोरेज इत्यादींचा समावेश आहे.
अंबानी यांनी एआय डॉक्टर आणि एआय टीचर यांचा समावेश असलेल्या इतर एआय सेवांबद्दलही सांगितले. ते म्हणाले की, ज्या भागात सेवा इत्यादी सहज पोहोचू शकत नाहीत, अशा भागात अनेक लोकांना एआय डॉक्टर मदतीचा फायदा होत आहे. तर अनेक लोक एआय टीचरचा शिक्षणात फायदा घेत आहेत.
दरम्यान, या सभेत 2जी मुक्त भारताचा नारा देताना अंबानी म्हणाले की, जिओने 50 टक्के वापरकर्ते 3जीशी जोडले आहेत. याशिवाय आज जिओ देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे आणि तो देशातील सर्वात मोठा पेटंटधारक बनला आहे. जिओकडे सध्या 5G, 6G मध्ये 350 हून अधिक पेटंट आहेत. कंपनीने 5G फोन सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवले असून 2 वर्षात जिओचे 13 कोटी ग्राहक 5G शी जोडले गेले आहेत. त्यामुळे आता 2G ग्राहक देखील 5G वर अपग्रेड करत आहेत.