महाराष्ट्र

ब्रेकिंग! महाराष्ट्र काँग्रेसमध्ये भूकंप

आगामी विधानसभा निवडणूकीसाठी आता सर्व पक्ष कामाला लागले आहे. त्याचे राज्यभर दौरे सुरु आहेत. दरम्यान काँग्रेसच्या गोटातून एक महत्त्वाची बातमी समोर आली असून जितेश अंतारपूरकर आणि झिशान सिद्धिकींची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी ही माहिती दिली आहे. 

अंतारपूरकर आणि झिशान हे दुसऱ्या पक्षात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोघांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्याची आल्याची माहिती पटोले यांनी दिली आहे. या कारवाईनंतर अंतारपूरकर हे भाजपमध्ये तर झिशान हे अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाची काही मते फुटली होती. त्यानंतर अंतापूरकर आणि काँग्रेसचे काही आमदार हायकमांडच्या रडारवर असल्याची चर्चा होती. त्यानंतर आता काँग्रसकडून अंतारपूरकर यांची पक्षाकडून हकालपट्टी करण्यात आली आहे. तर, इिशान यांनी नुकतीच मुंबईत आयोजित अजितदादा पवारांच्या जन सन्मान यात्रेत उपस्थित दर्शवली होती. अंतारपूरकर हे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे जवळचे मानले जातात. चव्हाण यांच्या भाजप प्रवेशापासून अंतारपूरकर हे भाजपच्या संपर्कात होते.

Related Articles

Back to top button