क्राईम

काळजाचा थरकाप उडवणारी घटना

अलीकडे गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा यांसारख्या घटना तर घडत आहेत. दरम्यान, भुवनेश्वर येथील खंदगिरी येथे एक खळबळजनक घटना घडली आहे. एका रोडरोमिओ एका मुलीवर एकतर्फी प्रेम करत तिला त्रास देत होता. याला मुलीच्या काकाने विरोध केला असता. परिणामी काकावर धारदार शस्त्राने डोके कापून शिरच्छेद केला. खून झालेला व्यक्ति हा बाईकवरून घरी परत येत असताना आरोपीने त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. आरोपीला अटक करण्यात आली आहे.
खंडगिरी पोलिसांच्या हद्दीतील जगन्नाथ नगरजवळील सुका विहार परिसरात ही घटना घडली. आरोपीला अटक करण्यात आली आहे. जगा मल्लिक असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे मल्लीकच्या पुतणीवर एकतर्फी प्रेम होते. यामुळे तो मुलीला त्रास देत होता. आरोपी त्रास देत असल्याचे मुलीने मल्लीकला सांगितले होते. यामुळे मल्लीकने आरोपीला समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा त्रास दिल्यास बरे वाईट करण्याची धमकी देखील आरोपीला मल्लीकने दिली होती. मात्र, त्याने मुलीचा नाद सोडण्यास नकार दिला. जो त्याच्या प्रेमाच्या वाटेत येईल त्याला मारण्याचे आरोपीने ठरवले.
बुधवारी रात्री उशिरा १२ वाजण्याच्या सुमारास पूर्वनियोजित पद्धतीने आरोपी तलवार घेऊन निर्जन ठिकाणी जगाची वाट पाहत होता. जगा हा बाईकवरून घरी परतत असताना आरोपीने अचानक जगावर तलवारीने वर करत त्याचे डोके कापले. यानंतर आरोपी फरार झाला. तर जगाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच खंडेगिरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. 

Related Articles

Back to top button