ब्रेकिंग! महायुतीत मोठी घडामोड

आगामी विधानसभा निवडणूकीसाठी आता सर्व पक्ष कामाला लागले आहे. त्याचे राज्यभर दौरे सुरु आहेत. मागील काही दिवसापासून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची राज्यभर जन सन्मान यात्रा सुरु आहे. आगामी विधानसभा निवडणूकीत महायुतील तीनही पक्ष एकत्र लढणार असून त्यांच्यात लवकरच जागा वाटप होणार आहे. पण आता महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.
एका कार्यक्रमात मंत्री तानाजी सांवत यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बसल्यानंतर उलट्या होतात, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर आता महायुतीतील नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांनी अजितदादा यांना सत्तेतून पडण्याचे आवाहन केले आहे.
सावंत या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. मिटकरी म्हणाले की, सावंतांना उलट्या कशामुळे होतात हे माहिती नाही. सावंत हे आरोग्यमंत्री आहेत. आरोग्याचा काही संबंध असेल. मात्र महायुतीमध्ये असल्यामुळे त्यांना जर उलट्या होत असतील, तर त्या कशामुळे होतात हे एकनाथ शिंदेच सांगू शकतील.



