सोलापूर
सोलापूर ब्रेकिंग! कॉलेजला जाते म्हणून गेलेली मुलगी परतली नाही

सोलापूर (प्रतिनिधी) राहत्या घरातून जिल्हा परिषद जवळ असलेल्या एका महाविद्यालयात जाते म्हणून निघून गेलेली मुलगी घरी परतलीच नाही.अनेक ठिकाणी तिचा शोध घेतला परंतू ती आढळून आली नाही.या घटनेची हकीकत अशी की, २८ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता ही अल्पवयीन मुलगी मजरेवाडी येथील आपल्या घरातून कॉलेजला जाते म्हणून निघून गेली.अनेक ठिकाणी तिचा शोध घेतला. परंतु ती मिळून आली नाही. कोणीतरी अज्ञात इसमाने तिला फुस लावून पळवून नेल्याची फिर्याद विजापूर नाका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक तरंगे हे करत आहेत.