देश - विदेश

ब्रेकिंग! नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा

  1. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सर्वात मोठी घोषणा केली आहे. दिल्लीच्या भारत मंडपममध्ये गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली सीईओ स्तराची एक बैठक पार पडली.यात वाहन उद्योगातील अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. जुने वाहन भंगारात काढल्यास नवीन वाहनावर सवलत देण्याचा मुद्दा या बैठकीमध्ये उपस्थित करण्यात आला. याला कंपन्यांनीदेखील होकार दिला आहे. भंगारात काढलेल्या जुन्या मोटारींचे तपशील ‘वाहन’ संकेतस्थळावर दिले जाणार आहे. यामुळे ग्राहकांना अतिरिक्त सवलत मिळणार आहे.
    याचाच अर्थ आता जुने वाहन भंगारात काढल्यानंतर नवीन वाहनाच्या किमतीवर दीड ते तीन टक्के सवलत खरेदीदारांना मिळणार आहे. यासाठी प्रवासी व वाणिज्य वाहनांच्या निर्मात्यांनी होकार दर्शवला आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर कंपन्यांनी ही भूमिका जाहीर केली.
    यानंतर वाणिज्य वाहन निर्मिती कंपन्यांनी जुन्या भंगारात काढलेल्या वाहनाच्या बदल्यात नवीन वाहनाच्या खरेदीवर तीन टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला. यात टाटा मोटर्स, व्होल्व्हो, आयशर कमर्शियल व्हेईकल्स, अशोल लेलँड, महिंद्र अँड महिंद्र, फोर्स मोटर्स, इसुझू मोटर्स आणि एसएमएल इसुझू या कंपन्या 3.5 टन क्षमतेपेक्षा अधिकच्या वाहनांवर सवलत देणार आहेत.

Related Articles

Back to top button