खेळ

ब्रेकिंग! जय शहा आता आयसीसीचे नवे बॉस

जय शहा यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. याआधी त्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव म्हणून काम पाहिले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जय शहा यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी निवड होणार अशी चर्चा होती. अखेर यावर आयसीसीकडून अधिकृतरीत्या शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. 
जय शहा यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड होताच एक नवा इतिहास रचला आहे. अवघ्या 35 वर्षांचे जय शहा हे आयसीसी च्या इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष ठरले आहेत. यावर्षी 1 डिसेंबरपासून जय शहा त्यांचा कार्यभार स्वीकारणार आहेत. तसेच पुढचे सहा वर्ष ते आयसीसीच्या अध्यक्षपदी राहणार आहेत. याआधी आयसीसीचे अध्यक्षपदी ग्रेग बार्कले होते. मंगळवारी आयसीसीने याबाबत अधिकृत घोषणा केली.
यापूर्वीदेखील भारतीयांनी आयसीसीचे अध्यक्षपद भूषवले आहे. जय शहा यांच्याआधी जगमोहन दालमिया, शरद पवार, एन श्रीनिवासन आणि शशांक मनोहर यांनी आयसीसीचे नेतृत्व केले आहे. त्यानंतर आता जय शहा हे पाचवे भारतीय ठरले आहेत. 

Related Articles

Back to top button