50 MP कॅमेरा, फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि भन्नाट फीचर्स

देशात अलीकडे स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दरम्यान विवोने अखेर आपला नवीन स्मार्टफोन टी ३ प्रो 5G भारतीय बाजारपेठेत लॉन्च केला आहे. हे मॉडेल टी ३, टी ३ एक्स आणि टी ३ लाइटमध्ये सामील होऊन टी ३ मालिकेचा विस्तार केला आहे. विवो टी ३ प्रो 5G मध्ये ६.६७ इंचाचा एमोलेड कर्व्ड डिस्प्ले, ५५०० एमएएच बॅटरी आणि ५० मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे.
विवो टी ३ प्रो 5G सँडस्टोन ऑरेंज आणि एमराल्ड ग्रीन या दोन रंगात येतो. ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २१ हजार ९९९ रुपये आहे. तर, ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २३ हजार ९९९ रुपये आहे. ग्राहकांना तीन सप्टेंबर रोजी फ्लिपकार्ट, विवोची अधिकृत वेबसाइट आणि इतर रिटेल आउटलेट्सवरून हँडसेट खरेदी करता येणार आहे.
एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेचे कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना तीन हजार रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. फ्लिपकार्ट अॅक्सिस क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांना पाच टक्के अतिरिक्त कॅशबॅक मिळणार आहे.
विवो टी ३ प्रो 5G मध्ये ६.७७ इंचाचा फुल एचडी+ 3D कर्व्ड एमोलेड डिस्प्ले आहे, ज्याची चमक ४५०० निट्सपर्यंत आहे आणि रिफ्रेश रेट १२० हर्ट्झ आहे.