आनंदवार्ता! सोन्याचे भाव घसरले

संपूर्ण देशभरात आज दहीहंडीचा उत्सव साजरा केला जात आहे. आजच्या या शुभ दिनी सराफा बाजारातही उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. कारण आज सोन्याने ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच काल भावात कोणतेच बदल झाले नाही. मात्र, आज घसरणीचे संकेत मिळत आहेत.
मागच्या आठवड्यात सोने चांगलेच वधारले होते. त्यानंतर सोने 670 रुपयांनी घसरले. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी भावात कोणताच बदल झाला नाही. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, आता 22 कॅरेट सोने 67,100 रुपये प्रति दहा ग्रॅम झाले आहेत. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,190 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. आज चांदीने देखील दिलासा दिला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीलाच चांदीत 200 रुपयांची घसरण दिसून आली. आज सकाळच्या सत्रात चांदीत पुन्हा घसरणीचे संकेत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 87,800 रुपये आहे.