बिजनेस

‘या’ तारखेला लाँच होणार आयफोन 16

भारतात आयफोन घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे आयफोनची मार्केटमध्ये चलती आहे. आता, ॲपलकडून आयफोन 16 सीरीज पुढील महिन्यात लाँच करण्यात येत आहे. ॲपलच्या या 16 सीरीजमधील सर्वच मॉडेलची किंमत ऑनलाइन लीक झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना अगोदरच पैशांची जुळवाजुळव करणे शक्य होणार आहे.
आयफोनच्या नवीन सीरीजची ग्राहक आतुरतेने वाट पाहत असतात. गतवर्षी आयफोन 15 ची सीरीज लाँच झाल्यानंतर त्याच्या खरेदीसाठीही स्मार्टफोन ग्राहकांची झुंबड उडाली होती. आता ग्राहकांकडून आयफोन 16 सीरीजची वाट पाहिली जात आहे. काही दिवसांपूर्वी आयफोन 16 आणि आयफोन 16 प्रोचा डमी लीक झाला होता. त्यामुळे या फोनचे डिजाइन ओपन झाले. विशेष म्हणजे ही नवी आयफोन सीरीज AI फीचर्ससह ग्राहकांना मिळणार आहे. या सीरीजचे सर्वच मॉडेल मेड इन इंडिया असण्याचीही शक्यता आहे. दरम्यान आयफोन 16 सीरीजचे 10 सप्टेंबर रोजी लाँचिंग होणार आहे.
भारतात आयफोन 16 फोनची किंमत 89,900 रुपये असू शकते. आयफोनच्या प्रो मॉडेल्सचा विचार केल्यास  भारतात आयफोन 16 Pro या फोनची किंमत 1,34,900 रुपये एवढी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
16 सीरीजमधील आयफोनचा डिस्प्ले iPhone 15 च्या तुलनेत मोठा असेल. iPhone 16 आणि iPhone 16 Plus मध्ये अनुक्रम 6.1 इंच आणि 6.7 इंच डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. तर, iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max मध्ये अनुक्रम 6.3 इंच आणि 6.9 इंच डिस्प्ले मिळू शकतो. 

Related Articles

Back to top button