राजकीय
ठाकरे गटाला मोठा धक्का
आगामी विधानसभा निवडमुकांच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी काल जळगाव दौऱ्यावर होते. यावेळी मोदी यांच्या स्वागताला ठाकरे गटाचा आमदार विमानतळावर दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. ठाकरे गटाचे कन्नडचे आमदार उदय सिंग राजपूत हे मोदी यांच्या स्वागताला विमानतळावर हजर होते. त्यामुळे राजपूत हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
तसेच ठाकरे गटाला मुंबईतही मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका, शिक्षण समिती अध्यक्ष संध्या दोशी यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. संध्या या स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. संध्या या पश्चिम उपनगरातील ठाकरे गटाचा महत्वाचा चेहरा होत्या. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मुंबईमध्ये मोठा धक्का मानला जातो. संध्या या मुंबई महानगरपालिका वार्ड क्रमांक 18 मधून तीन वेळा नगरसेविका राहिल्या आहेत.