वाल्मिक कराडचा ‘तिच्या’ घरी मुक्काम

बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड कराड असल्याचा आरोप देशमुख कुटुंब तसेच विरोधी पक्षाकडून केला जात आहे .या प्रकरणी अजितदादा पवार गटाचे नेते धनंजय मुंडे देखील अडचणीत सापडले आहेत.
कराड हा मंत्री मुंडे यांच्या जवळचा आहे, असा आरोप सातत्याने केला जातोय. सध्या बीड हत्या प्रकरणाची चौकशी सीआयडी कडून केली जात आहे. तसेच बीड पोलीसही याचा तपास करत आहेत. अशात आता कराडबद्दल एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड असलेला वाल्मिक हा कुठे लपून बसलाय ते समोर आले आहे. वाल्मिक हा महाराष्ट्रातच असून सीआयडीचे विशेष पथक त्याच्या शोधासाठी रवाना झाले असल्याची माहिती आहे. काही मीडिया रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणी वाल्मिकच्या पत्नीची देखील चौकशी करण्यात आली आहे. संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी सीआयडीच्या अधीक्षकांची भेट घेतल्यानंतर वाल्मिक यांच्या पत्नीचा तपास सुरु असल्याची माहिती आहे. सध्या ज्योती जाधव यांची चौकशी सुरु असून ज्योती या वाल्मिकची दुसरी पत्नी असल्याचा दावा देशमुखांनी केला आहे.