खेळ

रोहित शर्मामुळे बाबर आझमच्या वर्चस्वाला धोका

आयसीसीने आज ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत बरीच उलथापालथ झाल्याचे पाहायला मिळत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने एकदिवसीय मालिकेत दोनवेळा अर्धशतक झळकावत चांगली कामगिरी केली होती. याचाच फायदा त्याला झाला आहे. 

रोहित एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. त्यामुळे पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या वर्चस्वाला धोका निर्माण झाला आहे.
रोहितनंतर तिसऱ्या क्रमांकावर शुभमन गिल आणि चौथ्या क्रमांकावर विराट कोहलीचा नंबर आहे. श्रीलंका विरुद्धच्या मालिकेत जिथे कोहलीसह संपूर्ण टीम इंडिया फिरकीपुढे चाचपडत होता, अशा पिचवर रोहितने धमाकेदार बॅटिंग केली. पहिल्या सामन्यात रोहितने ५८ धावांची खेळी केली. 
त्यानंतर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने 64 धावा केल्या. यानंतर मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेत रोहितने ३५ धावांची खेळी केली. यातसुद्धा आश्चर्याची बाब म्हणजे रोहितने तब्बल 141.44 च्या स्ट्राइक रेटने या धावा केल्या होत्या. भलेही भारताने श्रीलंकेविरुद्धची सिरीज हरली असेल, मात्र रोहितला त्याच्या देदीप्यमान कामगिरीचा आयसीसी रँकींगमध्ये मोठा फायदा झाला आणि गिलला मागे टाकत तो क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला.

Related Articles

Back to top button