गर्व से कहो हम हिंदू है…

अयोध्येतील राम मंदिराचे मोठ्या थाटामाटात आज लोकार्पण करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. हा भव्य दिव्य ऐतिहासिक सोहळ्या अवघ्या जगाने टीव्हीवर बघितला. दरम्यान प्रभू श्रीराम मंदिरात विराजमान होताच देशभरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या सोहळ्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीट करत आपली प्रतिक्रिया दिली. राम मंदिर लोकार्पण सोहळ्यानंतर राज यांनी आपल्या अधिकृत X अकाऊंटवरून प्रभू श्रीरामांचा व्हिडीओ पोस्ट केला. आज कारसेवकांचे आत्मे सुखावले आणि ३२ वर्षांनी शरयू नदी हसली! जय श्रीराम!, असे राज यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
तसेच या सोहळ्याच्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो शेअर करत गर्वसे कहो हम हिंदू है, असे म्हटले आहे.