ब्रेकिंग! भाजप मोठा धमाका करण्याच्या तयारीत

लोकसभेतील अपेक्षाभंगानंतर महायुती आता ताकही फुंकून पिणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे विश्वासू भुपेंद्र यादव यांची महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीतील जय-पराजयाचा सर्वे झाला असून, भाजपाने किमान दीडशे जागांवर दावा ठोकण्याची शक्यता वाढली आहे.
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत दीडशेपेक्षा अधिक जागा लढवण्याचा भाजपचा निर्धार राज्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. याच मागणीवर स्थानिक नेते कायम असल्याचे दिसून येत आहे. विधानसभेला पक्षाने दीडशे जागा लढवणे कशाप्रकारे आवश्यक आहे, हा मुद्दा उचलून धरण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रात शहा यांचे विश्वासू असलेले यादव यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली होती.
यादव यांच्याकडून आज मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात आज एक बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महामंत्री संजय केनेकर, विजय चौधरी, विक्रांत पाटील, माधवी नाईक, चित्रा वाघ आणि श्रीकांत भारतीय उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील पाच महामंत्र्यांकडून विभागीय संघटनात्मक आढावा घेतला जाईल.