महाराष्ट्र
ब्रेकिंग! शरद पवारांची मोदींकडे मोठी मागणी

- मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा वाढवली पाहिजे. त्याचे अधिकार केंद्राला आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या समस्येवर तोडगा काढायचा असेल तर, धोरण बदला, अशी मागणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोदी सरकराकडे केली आहे. केंद्र सरकारने ही मर्यादा वाढवली तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ, असेही पवार म्हणाले. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
आज 50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देता येणार असा निर्णय कोर्टाने दिलेला आहे. तामिळनाडूत 73 टक्क्यांच्या आसपास आरक्षण दिले होते. तो निर्णय कोर्टात टिकला होता, असेही पवार म्हणाले. त्यानंतर कोर्टात जे निर्णय दिले, ते निकाल तामिळनाडूसारखे नाही. याचाचा अर्थ धोरण बदलणे गरजेचे आहे. मात्र, 50 टक्क्यांच्यावर आरक्षण द्यायचे हा अधिकार केंद्राचा आहे. त्यामुळे आता ही समस्या सोडवण्यासाठी केंद्राने पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे पवार म्हणाले.