क्राईम
मसाज पार्लरवर धाड

राज्यातील विविध भागात अलीकडे गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दरम्यान, अमरावतीत भर वस्तीत सुरू असलेला गैरकारभार पोलिसांनी उघडकीस आणला आहे. येथील राजकमल चौक ते राजापेठ रस्त्यावर एका इमारतीत असलेल्या स्पा-मसाज सेंटरमध्ये पोलिसांनी धाड टाकली. यावेळी येथे सुरू असलेल्या कारभारामुळे पोलिसांनादेखील धक्का बसला. याठिकाणी काही तरुणी आणि तरुण नको त्या अवस्थेत पोलिसांना आढळले. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार राजकमल चौक येथे एका इमारतीत वेश्या व्यवसाय सुरू असल्याची तक्रार येथील स्थानिकांनी पोलिसांकडे केली होती. मसाज सेंटरच्या नावाखाली या ठिकाणी गैरप्रकार सुरू असल्याची तक्रार स्थानिकांनी पोलिसांकडे केली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने या ठिकाणी धाड टाकली.
सिटी कोतवाली पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली. यावेळी काही तरुणी व तरुण अश्लील कृत्य करत असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी मसाज सेंटर येथून तरूण व तरुणींना अटक केली आहे. या मुली वेश्या व्यवसाय करत असल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, या पूर्वीदेखील येथील नागरिकांनी स्थानिक नगरसेवकाला याची माहिती दिली होती. त्याने स्पा मालकाला हा धंदा बंद करण्यासाठी सांगितले होते. मात्र, तरीसुद्धा हा गैरप्रकार सुरूच होता. यामुळे पोलिसांना याची माहिती देण्यात आली व ही कारवाई करण्यात आली.