बिजनेस

शासनाचा नवा निर्णय

सोलापूरसह अन्य भागात रेशन कार्डधारकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे दरम्यान, शासन निर्णयानुसार आता जे लोक आयकर भरतात आणि त्यांच्याकडे दहा एकर पेक्षा अधिक जमीन आहे. अशा लोकांना आता शासनाकडून पुरवल्या जाणाऱ्या मोफत रेशनचा लाभ बंद होणार आहे.
म्हणजे शासन निर्णयानुसार ज्या शेतकऱ्याकडे दहा एकर पेक्षा अधिक शेत जमीन आहे. अशा शेतकऱ्यांचे रेशन कार्ड बंद होणार आहे. शासनाने याबाबत आता यादी तयार करून संबंधित जिल्हा पुरवठा विभागाकडे पाठवली आहे. म्हणजे येथे काळामध्ये अनेकांचे रेशन कार्ड रद्द होणार आहे. जे लोक अपात्र असून रेशन कार्डचा लाभ घेतात, त्यांना आता रेशन मिळणार नाही व रेशन कार्ड कायमस्वरूपी बंद होणार आहे.
या लोकांना स्वस्त धान्य लाभ बंद करून त्यांना पांढरे रेशन कार्ड दिले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच ज्या लोकांनी चार महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून रेशन भरले नसेल, आधार लिंक केले नसेल अशा लोकांचे देखील रेशन कार्ड रद्द होणार आहे.
जर तुम्ही अन्य कारणामुळे किंवा आयकर भरत असल्याने, जर तुम्ही अपात्र ठरत असाल तर शासनाकडून मिळणाऱ्या स्वस्त रेशनचा लाभ घेत असाल तर अशा लोकांकडून 27 रुपये प्रति किलो या दराने त्यांना मिळणाऱ्या धान्याची किमतीची वसुली केली जाणार आहे.

Related Articles

Back to top button