क्राईम

पोलीस जवानाचा अपघातात मृत्यू

पोलीस दलात नोकरी करणाऱ्या पोलिसाचा मुंबई विक्रोळी कांजुरमार्ग रेल्वे स्टेशन दरम्यान अपघातात मृत्यू झाल्याची घटना दुपारी घडली. होमगार्डची सेवा बजावीत असताना पोलीस भरती होवून मुंबई येथे सेवा बजाविणाऱ्या तरुण पोलीस जवानाचा मृत्यू झाल्याने मदनवाडी गावावर शोककळा पसरली आहे.
याबाबत कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र बाळासाहेब हाके (वय -28) पोलीस कॉन्स्टेबल बक्कल नंबर 319 नेमणूक एलए 1 मुंबई शहर (रा. मदनवाडी ता.इंदापूर) यांचे रेल्वे अपघातात निधन झालेले आहे. सेवा बजावीत असतानाच पोलीस जवान रवींद्र यांचा मृत्यू झाला आहे. तीन वर्षापूर्वी होमगार्डची सेवा बजावीत असताना रवींद्र हा पोलीस भरती झाला आणि मुंबई येथे तो सेवा बजावीत होता.
वर्षभरापूर्वीच रवींद्रचे लग्न होवून आठवड्यापूर्वी त्याला मुलगा झाला. त्याचा आनंद व्यक्त करून परत पोलीस सेवेत हजर झाला होता. अतिशय प्रामाणिक रवींद्रचा अपघाती मृत्यू झाल्याने मदनवाडी गावावर शोककळा पसरली आहे.

Related Articles

Back to top button