सोलापूर

ब्रेकिंग! शरद पवारांच्या सभे ठिकाणी गोंधळ

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार तयारीला  लागले आहेत. त्याच अनुषंगाने ज्येष्ठ नेते शरद पवार आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. सोलापूरमधील बार्शी येथे आज पवार यांची भव्य सभा पार पडली. या सभेत पवारांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार तोफ डागली. सभेला येण्याआधी पवारांचा ताफा कुर्डूवाडी येथे मराठा आंदोलकांनी अडवला होता. हे ताजे असतानाच आता पवार यांचे भाषण सुरु असताना एक धक्कादायक घटना घडताना वाचली. सभेच्या ठिकाणी एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही दुर्घटना टळली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पवारांच्या सभेच्या ठिकाणीच एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रसंग टळला असून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Related Articles

Back to top button