महाराष्ट्र
कोणीही मला मेसेज किंवा फोन करू नये

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा मोबाईल हॅक झाला आहे. सुळे यांनी आज स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. त्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.
सुळे यांनी आज दुपारी एकच्या सुमारास पोस्ट करत म्हणाले, अत्यंत महत्वाचे, ‘माझा फोन आणि व्हॉटस्अप हॅक झाले आहे. कोणीही मला मेसेज किंवा फोन करून नये. याबाबत मी पोलीस तक्रार करत आहे. कृपया याची नोंद घ्यावी, असे ट्विट सुळे यांनी केले आहे. सुळे यांनी ही पोस्ट करत जनतेला सावध राहण्यास सांगितले आहे.