राजकीय

ब्रेकिंग! अजितदादांच्या जीवाला धोका; मालेगाव दौऱ्यावेळी काळजी घ्या

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जिवाला धोका असल्याची बातमी समोर आली आहे. गुप्तचर यंत्रणांकडून पोलीस प्रशासनाला अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जळगावचे जिल्हा पोलीस प्रमुख महेश्वर रेड्डी यांनी अधिकाऱ्यांना पत्राद्वारे ही माहिती दिली आहे.
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादा यांनी नाशिकच्या दिंडोरी येथून राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेला सुरूवात झाली. या यात्रेच्या माध्यमातून ते राज्यभर दौराही करणार आहेत. 

या दौऱ्यात त्यांच्या जिवाला धोका असून मालेगाव दौऱ्यादरम्यान त्यांची विशेष काळजी घेण्याच्या सूचनाही पोलिसांनी दिल्या आहेत. अजितदादा उद्या मालेगाव, धुळे दौरा करणार आहेत. मालेगाव, धुळे शहरातील काही संघटनांकडून धोकादायक हालचाली सुरू असून अजितदादा पवारांच्या मालेगाव दौऱ्यात त्यांच्या सुरक्षेबाबत अलर्ट राहण्याच्या सूचना गुप्तचर यंत्रणांनी दिल्या आहेत.
दरम्यान, राज्यात मालेगावची अतिसंवेदनशील भाग म्हणून ओळख आहे. 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामुळे संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर ही मालेगावात जातीय दंगली भडकल्या  आहेत. त्यामुळे जातीयवादी दंगलीमुळे मालेगावची राज्यात संवेदनशील भाग म्हणून ओळख आहे.

Related Articles

Back to top button