सोलापूर
ब्रेकिंग! सोलापुरातील डॉक्टरला शिवीगाळ

सोलापूर (प्रतिनिधी) प्लॉट खरेदीच्या कारणावरून शिवीगाळ केल्याप्रकरणी एका जणाविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना ११ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास असेंट टॉवर मुस्लिम पाच्छा पेठ येथे घडली.
याप्रकरणी डॉक्टर अब्दुल कादिर बुजुर्गसाहेब पटवेगर (वय-७१, रा.उत्तर सदर बझार, विद्यानगर) यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अल्ताफ विजापुरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेची हकीकत अशी की, फिर्यादी हे असेन टॉवर अपार्टमेंट मधील चौथ्या मजल्यावरील प्लॉट नंबर ४०२ च्या समोर आले असता, अल्ताफ विजापुरे हा अनाधिकृत राहत असून त्याला प्लॉट खरेदी केल्याबाबत विचारणा केली. त्यावेळी त्याने होय मी प्लॉट खरेदी केला आहे असे म्हणाला. फिर्यादी यांनी कागदपत्रे दाखवा असे बोलले असता अल्ताफ याने कागदपत्रे न दाखवता शिवीगाळ करून फिर्यादी यांना धक्का देऊन जमिनीवर पाडले.या घटनेत त्यांच्या उजव्या पायाच्या करंगळीवर मार लागून फॅक्चर झाला आहे. असे फिर्यादीत नमूद आहे.पुढील तपास पोलीस हवालदार खान हे करीत आहेत.