ब्रेकिंग! पंतप्रधान मोदींकडून देशाला गुड न्यूज

Admin
2 Min Read
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित केले. भाषणादरम्यान मोदी कोणती मोठी घोषणा करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले होते. उद्यापासून नवीन जीएसटी दर लागू होणार असल्याने मोदी देशाला संबोधित करणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु होती. राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात होते. अखेर प्रतिक्षा संपली आहे. मोदी यांनी आपल्या भाषणातून अनेक मोठे धमाके केले आहेत. 
  • मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात नवरात्रीच्या सुरुवातीची घोषणा केली. देशवासियांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले की, 22 सप्टेंबर हा नवरात्रीचा पहिला दिवस आहे. त्या दिवशी नवीन जीएसटी लागू केला जाईल. या प्रसंगाचे विशेष वर्णन करताना पंतप्रधान म्हणाले की, हा केवळ उत्सव साजरा करण्याचा काळ नाही, तर आर्थिक विकास आणि कर सुधारणांसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे.
  • जीएसटीमध्ये सुधारणा करण्याचा हा निर्णय आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. जीएसटी सुधारणांचा देशातील सर्व घटकांना फायदा होईल. पूर्वीची कर प्रणाली, जी विविध करांचे मिश्रण होती, त्यामुळे सामान्य नागरिकांचे नुकसान झाले. आम्ही सार्वजनिक हितासाठी आणि राष्ट्रीय हितासाठी जीएसटी लागू केला. आता देश डझनभर करांच्या ओझ्यातून मुक्त झाला आहे. ‘एक राष्ट्र, एक कर’ चे स्वप्न प्रत्यक्षात आले आहे.
  • मोदी म्हणाले, ‘नागरिक देवो भव:’ हा मंत्र, ज्याच्या मदतीने आपण पुढे जात आहोत, तो जीएसटीच्या पुढील पिढीतील सुधारणांमध्ये प्रतिबिंबित होईल. गेल्या एका वर्षात आयकर आणि जीएसटीबाबत घेतलेल्या निर्णयांमुळे देशातील लोकांचे 2.5 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे वाचतील. विकसित भारताच्या ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी आपल्याला स्वावलंबी व्हावे लागेल.
Share This Article