राजकीय

ब्रेकिंग! महायुतीत मोठं काहीतरी घडणार?

महायुतीला आता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार नकोसे झाले आहेत अशा चर्चा आहेत. अजितदादा यांना सोबत घेतल्याने लोकसभेत फटका बसल्याचे भाजपा आमदारांचे मत असून आता अजितदादा यांना सोबत ठेवावे की नको याबाबत फेरविचार करण्याची मागणी भाजपाच्या आमदारांकडून करण्यात येत आहे. महत्वाची बाब म्हणजे लोकसभेतील पराभवाचे खापर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यापूर्वी अजितदादा गटावर फोडले होते. आता भाजपा आमदारांनीसुद्धा अजितदादा गटाबाबत नाराजी दर्शवल्याने महायुतीत पुढे काय होणार ते आता बघावे लागणार आहे.

अजितदादा गटाची मते भाजपा आणि शिंदे गटाचे ट्रान्सफर न झाल्याचा भाजपा आमदारांचा दावा आहे. त्यासाठी राज्यातील लोकसभा मतदारसंघांची यादीच समोर केली आहे. खास करून सोलापूर, माढा, मावळ, दिंडोरी, शिरूर इत्यादी मतदारसंघांमध्ये अजित पवार गटाची ताकद असूनही महायुतीच्या उमेदवाराला अपेक्षित मतदान झाले नाही. इतर मतदारसंघातही अजितदादा गटाचे कार्यकर्ते आणि नेते सक्रिय नसल्याचा दावा भाजपा आमदारांकडून करण्यात येत आहे. परिणामी अजितदादा यांना सोबत ठेवण्याचा पुनर्विचार करावा, अशी मागणी आता भाजपमध्ये जोर धरू लागली आहे.

Related Articles

Back to top button